शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

सांगली महापालिकेची बॅँक खाती सेवाकरापोटी सील होणार = केंद्रीय उत्पादन शुल्कची कारवाई :

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2018 01:06 IST

सांगली : महापालिकेने केंद्रीय उत्पादन शुल्क विभागाचा दीड कोटीचा सेवा कर थकविल्याने येत्या ३१ मार्चपर्यंत ही रक्कम न भरल्यास पालिकेची बँक खाती सील करण्यात येणार आहेत

ठळक मुद्देदीड कोटीचा सेवा कर थकविला

सांगली : महापालिकेने केंद्रीय उत्पादन शुल्क विभागाचा दीड कोटीचा सेवा कर थकविल्याने येत्या ३१ मार्चपर्यंत ही रक्कम न भरल्यास पालिकेची बँक खाती सील करण्यात येणार आहेत. तशी नोटीस केंद्रीय उत्पादन शुल्क विभागाने महापालिकेला दिली आहे. त्यामुळे महापालिकेत खळबळ उडाली असून बँक खाती सील होऊ नयेत, यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत.महापालिकेचे दुकाने गाळे, व्यापारी संकुल, जाहिरातींचे फलक आदी व्यावसायिक कारणांसाठी वापर होणाऱ्या मालमत्तांवर सेवा कर आकारला जात होता. मार्च २०१४ पर्यंत या कराची ८० लाखांची थकबाकी होती. उत्पादन शुल्क विभागाने वारंवार नोटिसा बजावूनही पालिकेने हा कर भरला नाही. अखेर पालिकेला व्याजासहीत ८० लाखांचा दंड ठोठावण्यात आला. दंड, व्याज व मूळ रक्कम असे १ कोटी ६० लाख रुपये भरण्याची नोटीस पालिकेला बजावण्यात आली. यानंतर पालिकेने २४ लाख रुपये जमा केले. दंड व व्याज आकारणीच्या विरोधात मुंबईत लवादाकडे अपील केले. लवादाने पालिकेची बाजू ऐकून घेत उत्पादन शुल्क विभागाच्या कारवाईला स्थगिती दिली. पण पालिकेला सुनावणी होईपर्यंत १० लाख रुपये उत्पादन शुल्क विभागाकडे जमा करण्याचे आदेश दिले. मात्र पालिकेने स्थगिती मिळाल्यानंतर हे पैसे भरले नाहीत. लवादाने कारवाईवरील स्थगिती उठवली. त्यानंतर पालिकेने १० लाख रुपये उत्पादन शुल्क विभागाकडे भरले.गेले वर्षभर उत्पादन शुल्क विभागाने याप्रकरणी कारवाई केलेली नाही. मार्च एण्ड जवळ असल्याने या विभागाच्या वरिष्ठ अधिकाºयांनी थकीत सेवा कर वसुलीची मोहीम सुरु केली आहे. याअंतर्गत पालिकेला पुन्हा नोटीस बजावण्यात आली असून, दंड व व्याजासह १ कोटी ६० लाख रुपये मार्चअखेर भरण्यास सांगितले. हे पैसे न भरल्यास पालिकेची बॅँक खाती सील करण्याचा इशारा दिला आहे.प्रशासनाची लवादाकडे धावमहापालिकेने या कारवाईविरोधात मुंबईत लवादाकडे धाव घेतली आहे. पालिकेचे अधिकारीही मुंबईला रवाना झाले आहेत. काही पैसे भरून या कारवाईवर स्थगिती मिळविण्याचा प्रयत्न पालिका प्रशासन करत आहे. यापूर्वी थकीत रकमेपोटी लवादाने स्थगिती दिली होती. तेव्हा पालिकेला दहा लाख रुपये जमा करण्याचे आदेश दिले होते. पण हे पैसेही भरले न गेल्याने लवादाने स्थगिती उठविली होती.